Government Job 2021 – अडीच लाख शासकीय पदे रिक्‍त ! जाणून घ्या

[ad_1]

Government Job 2021 : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.

Vacancy Details – झेडपीतील रिक्‍तपदांचा घोषवारा… 

  • प्राथमिक शिक्षक : 596
  • मुख्याध्यापक : 142
  • आरोग्य कर्मचारी : 405
  • पशुधन विकास अधिकारी : 41
  • बांधकामसह अन्य विभाग : 189
  • एकूण : 1,250

सोर्स : सकाळ


सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता 

Government Job 2021 : कोरोना लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर आता राज्य सरकारने भरती प्रकियेला गती देण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरतीची गुडन्यूज दिल्यानंतर, पोलीस दलातही मोठी भरती लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यानंतर, आता शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनीही ट्विटरवरुन शिक्षण विभागातील भरतीसंदर्भात माहिती दिली आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विभागाकडून भरती प्रकियेची जाहिरात निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते. आता, वर्षा गायकवाड यांनीही शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण २६६ पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलंय. त्यासोबतच, शासनाचे पत्रही जोडण्यात आले आहे. त्यामुळे, आता लिपिक पदासाठी लवकरच जाहिरात निघणार असून उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

सोर्स : लोकमत


Government Job 2021 : सरकारी नोकरी करण्याची बर्‍याच लोकांची इच्छा असते, पण सरकारी नोकरीचं स्वप्न काहींचं अपूर्णच राहतं. दरवर्षी बरेच तरुण सरकारी नोकरीची तयारी सुरू करतात. काही तरुण 12 वीनंतर आणि काही पदवीनंतर सरकारी नोकरीची तयारी करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक तरुण त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु काहीवेळा अर्ज करूनसुद्धा त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. पण त्यातून निराश होण्याची आवश्यकता नाही, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. आतासुद्धा सरकारनं अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवलेले आहेत. (Government Job 2021 Live Updates Today Apply Online For India Post UPPCL NALCO ECIL ETC GOVT JOBS)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

NHM Recruitment 2021: NHM मध्ये गुणवत्तेच्या आधारे होणार निवड, आजच अर्ज करा

हरियाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) विभाग अनेक पदांवर भरती करणार आहे. ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे तरुण अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.

NALCO Recruitment 2021: दहावी पास 90,000 पर्यंत पगार मिळेल

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर रोजगार निर्मित करत आहे. इच्छुक उमेदवार 30 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला 90,000 पर्यंत पगारही मिळेल.

ECGC PO Recruitment 2021

आपण पदवीधर असल्यास पीओच्या रिक्त पदांसाठी अर्ज करा

ECGC PO Recruitment 2021: ईसीजीसीने अनेक रिक्त पीओ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेचे पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

NITI Aayog Recruitment 2021 – नीती आयोगात नोकरीसाठी त्वरित अर्ज करा, बरेच फायदे मिळणार

NITI Aayog Recruitment 2021: नीती आयोग अनेक पदांवर नोकरभरती करत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार केवळ 24 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. खास गोष्ट म्हणजे आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अर्ज फी घेतली जात नाही आणि दिल्लीत आपल्याला सरकारी नोकरी सहज मिळेल. एवढेच नाही तर आपल्याला दरमहा 60,000 पर्यंत पगारही मिळेल. म्हणून लवकरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

NIHFW Recruitment 2021 – दिल्लीत सरकारी नोकरीसाठी मोठी संधी, आजच अर्ज करा

NIHFW Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफसह इतर अनेक पदं आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी पदवीधारक ते आठवी पास अर्ज करू शकतात.

KVS Recruitment 2021 – KVS मध्ये परीक्षा न घेता मिळणार नोकरी, आजच अर्ज करा

KVS Recruitment 2021: केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) मधील उपायुक्तांच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपल्याला फक्त मुलाखत द्यावी लागेल आणि अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही. एवढेच नव्हे तर 2,09,200 रुपयांपर्यंतचे मासिक वेतनही निश्चित केले गेले आहे.

Government Job 2021 – DRDO: परीक्षा किंवा मुलाखत, गुणवत्ता यांनाही सरकारी नोकरी मिळणार नाही

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) प्रेंटीसच्या अनेक वेगवेगळ्या पदांवर भरती करणार आहे. 29 जानेवारी 2021 रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सक्रिय होईल. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपली निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही.

सोर्स : TV9 मराठी

[ad_2]

Source link